चाळीसगाव। ताक्यातील कुंझर येथे भावजयीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंझर येथील विवाहितेचा गळफासाने मृत्यू झाल्याची घटना काल समोर आली होती. यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता, अखेर पोलिसांनी तपासाअंती दिरावर अत्याचारासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आई आणि आजीच्या मदतीने गळफासाचा बनाव करण्यात आल्याचेही समोर आले आहे. समाजमन सुन्न करणार्या या घटनेने अख्खा तालुका हादरला आहे.
पती चैन्नई येथे सैन्यात कार्यरत
या बाबतची सविस्तर हकीकत अशी की तालुक्यातील सर्वात लांब असलेले खेडे गाव म्हणून कुंझर गावाचा उल्लेख केला जातो. धुळे तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या या गावात रामचरण छगन बैरागी हा तरुण चेन्नई येथे सैनिक सेवेत रुजू आहे त्यांचा विवाह शिंदी ता भडगाव येथील विकास गोकुलदास बैरागी याची कन्या प्रियंका हिच्याशी झाला होता त्याच्या संसारवेली वर एक मुलगा व एक मुलगी ही दोन मुले आहेत भाऊ सैनिक असल्याने घरी एकटीच राहणारी भावजयी वर अनेक दिवसांपासून दिर प्रवीण छगन बैरागी याची वाईट नजर होती, हिची कुणकुण प्रियंका बैरागीला होती तिने अनेकदा आपल्या माहेरी दिराच्या लक्षणाबाबत तक्रार केली होती. यामुळे माहेरच्या लोकांनी नराधम दिराला समजावून प्रियंकाला गेल्या आठ दिवसांपूर्वीच कुंझर गावी पाठविले होते. भावजयी कडे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलानंतर प्रियंकाच्या विरोधाचा राग अनावर झाल्याने दिराने बलात्कार करून तिला गळफास दिल्याचे पोलीस तापासात समोर आले आहे.
सुरुवातीला भावजयी ने गळफास लावून आत्महत्या केल्याची पोलिसात नोंद झाली होती. मात्र प्रियंकाच्या गळ्या भोवती व चेहर्यावर ओरबडल्याची व्रण असल्याने माहेरच्या लोकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी आग्रह केला त्यामधून हे गंभीर सत्य परिस्थिती पोलीस प्रशासनाच्या लक्षात आली, आज अखेर दुर्दैवी प्रियंकाचे वडील यांनी दिलेल्या तक्रारी वरून दिर प्रवीण छगन बैरागी, आई लिलाबाई छगन बैरागी ,आजी विमलबाई बैरागी या तिघांविरोधात मेहूनबारे पोलीस ठाण्यात बलात्कार (भादवी कलम376)रासह मनुष्यवधाचा भादवी कलम 302प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मेहूनबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ हे करीत आहेत.
दरम्यान, मृत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी त्यांचे पतीही उपस्थित होते. विवाहितेचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह 4 रोजी सकाळी 8-30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुंझर येथील राहते घरी मिळून आला होता. दरम्यान, मृत महिलेच्या आई वडीलांनी घातपात झाल्याचा आरोप करून धुळे येथे शवविछेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला होता. अखेर पोलिसांनी रा प्रकरणात अत्राचार व हत्रेचा गुन्हा दाखल केला आहे. रा घटनेमुळे तालुकाभरात मोठी खबळळ उडाली आहे.