जळगाव –एमआयडीसीतील ठिबक इंडस्ट्रिजमध्ये काम करणार्या मयुर पाटील या तरुणाने त्याठिकाणी काम करणार्या कामगाराच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३१ रोजी उघडकीस आली. दरम्यान आज तरुणाला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आसोदा येथील मयुर रविंद पाटील हा युवक एमआयडीसीतील एका ठिबक कंपनीत कामला आहे. त्याच ठिकाणी काम करणार्या कामगाराच्या मुलीवर मयुर याने अत्याचार करीत होता. दरम्यान त्या मुलीच्या पोटात अचानक दुखत असल्याने तीच्या कुटूंबीयांनी त्या मुलीची तपासणी केली असता. ती मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्या पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संशयीत आरोपी मयुर पाटील यास आज न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनाविली आहे.