अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

0
जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
जळगाव : 10 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या.दरेकर यांनी सुनावली. राजू रमेश निकम उर्फ कैलास असरू बनकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचे त्यावेळचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे होते.