जळगाव । तालुक्यातील करंज येथील अल्पवयीन मुलीला प्रातविधीला जात असतांना वाईट उद्देशाने तिला शेतात नेवून तिच्यावर अत्याचार करणार्या नराधाम तरुणाला तालुका पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. करंज येथील अल्पवयीन मुलीला मुकेश ज्ञानेश्वर सपकाळे या तरुणाने शेतात नेवून तिच्यावर गेल्यावर्षी अत्याचार केला होता. त्यातून तरुणी गरोदर राहिल्याने तिला 30 रोजी पुणे येथे मुलगा झाला होता. तरुणी कुवारी माता झाल्याने पिडीतेच्या भावाने पुणे पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून तालुका पोलिसात मुकेश ज्ञानेश्वर सपकाळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. संशयित नराधम मुकेश सपकाळे याला न्या. के.बी अग्रवाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला 7 मे पर्यंतची पोलिस कोठडी मिळाली.