चाळीसगाव । दोंडाईचा येथे शाळेत शिकणार्या पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केलेल्या नराधमास अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी येथील चौधरी वाडा येथुन 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शेकडो तेली समाज बांधवांनी शांततेत मुकमोर्चा काढला व तहसीलदार कैलास देवरे, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांना निवेदन दिले या मोर्चात मुली व लहान बालीका देखील सहभागी झाल्या होत्या. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पिडीत बालिकेच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी व बालिकेच्या कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर आर.डी.चौधरी, दिलीप रामराव चौधरी, सुरेश हरदास चौधरी, सुरेश गिरधर चौधरी, बा.नि.पवार यांच्या स्वाक्षर्या आहेत.