पिंपरी व कासारसाई घटनांचा केला निषेध
हे देखील वाचा
पिंपरी : अन्याय अत्याचार प्रतिबंध कृती समितीच्यावतीने पिंपरी येथील हत्याकांड व कासारसाई येथील अल्पवयीन मुलींवर बलात्कार या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कँडल मार्च काढण्यात आला. पिंपरीत दोन दिवसांपूर्वी धनश्री पुणेकर हिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करुन निदर्यपणे खून केला. त्या पीडित मुलीस न्याय मिळावा. या मागणीसाठी हा कँडल मार्च काढण्यात आला. अशा प्रकारचे वाईट कृत्य करणार्यांना पकडून त्वरीत जलदगती न्यायालयात फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चार दिवसांपूर्वी रमाबाई आंबेडकर, पिंपरी येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला असून एच.ए.मैदानातील झुडपात तिचा मृतदेह काल पोलिसांना मिळाला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. मागील दहा दिवसांपूर्वी कासारसाई हिंजवडी या ठिकाणी उस तोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केला त्यातील एकीचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी महिला, मुली यांचा अधिकचा वावर आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, भविष्यात अशा प्रकारची हृदयद्रावक घटना घडू नये, याकरिता झोपडपट्टी व इतर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, आरोपीस तात्काळ अटक करावी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील नियुक्त करुन हा खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी चंद्रकांता सोनकांबळे, भीमराव तुरुकमारे, बाळासाहेब रोकडे, सुरेश निकाळजे, राजू सावंत, अजिजभाई शेख, विजय फडतरे, अजय लोंढे, किरण तुरुकमारे, विशाल गायकवाड, किरण फडतरे, युवराज पवार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.