प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह ; श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत फ्युचर टेक्नोक्रॅट्स 2 के 19 तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन
भुसावळ- श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे कौशल्य संपन्न अभियंते आहेत. या भावी अभियंत्यांनी अत्याधुनिक तंत्रकौशल्ये आत्मसात करून त्यातून समाज विकासाला गती दयावी, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी येथे केले. कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित फ्युचर टेक्नोक्रॅट्स 2 के 19 तांत्रिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा.दिनेश पाटील, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.सुधीर ओझा, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी उपस्थित होते.
तांत्रिक स्पर्धेत 710 स्पर्धकांचा सहभाग
पीसी-असेंबली, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, टेक-टॉक, पोस्टर प्रेझेंटेशन, वेब मेनिया, सर्किट मेनिया, बॉक्स-क्रिकेट, पबजी, ट्रेझर हंट, फोटो मेनिया अश्या एकूण 10 तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकीच्या 22 महाविद्यालयातील एकूण 710 स्पर्धकांनी सहभाग नोदंवला. तांत्रिक स्पर्धांमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करण्यास प्रेरणा मिळून कॉम्प्युटर तंत्रज्ञानासोबत माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, वाहतूक व उर्जा या क्षेत्रामध्ये जास्तीत-जास्त संधी उपलब्ध होतील, असे मत विभाग प्रमुख प्रा.दिनेश पाटील यांनी व्यक्त केले.
यांनी घेतले परीश्रम
स्पर्धा यशस्वितेसाठी अजिंक्य नेवे, ध्रुव भारद्वाज, अक्षय भंगाळे, गणेश फालक, विशाल तायडे, चेतन चौधरी, अभिषेक लोखंडे, पंकज परदेशी, चेतन अमृतकर, कोमल चौधरी, प्रियंका अत्रे, कांचन निकुंभ, पायल राणे, निकीता पाटील, पल्लवी पाटील, ममता कोष्टी, हर्षिता महाजन, मानसी भावसार, श्रुती देवकर, देवश्री भंगाळे, श्रेया नेहे, सलोनी चौधरी, दीपाली ठाकरे, श्रद्धा चौधरी, मयुरी पाटील, एकता चौधरी, नेहा भोई या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.
विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थी असे-
फोटो मेनिया- कल्पेश तायडे, प्रोजेक्ट प्रेसेंटशन- शुभम जोशी, अभिजीत परदेशी, शुभम खडतकर, गौरव पाटील, पीसी असेंब्ली- प्रथम- अक्षीत अग्रवाल, द्वितीय- गोकुलकृष्ण अरुण नायर, सर्किट मेनिया- जयेश भोई, श्रीकृष्णा शिपलकर, टेक टॉक- शुभम जोशी, पोस्टर- पूजा बैरागी, वेब मेनिया- सतीश मानकर, पबजी- प्रथम- बीईस्ट (संघाचे नाव), द्वितीय- ठग (संघाचे नाव), ट्रेझर हंट- प्रथम- अक्षय आणि संघ, द्वितीय- विनीता भोळे आणि संघ बॉक्स क्रिकेट (मुले)- -प्रथम- आशिष निकम आणि संघ, द्वितीय- राहील आणि संघ (मुली)- प्रथम: – पूर्वा पटेल, द्वितीय-भाग्यश्री तायडे