मुंबई – अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ॲपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ झाला. गोल्डन अवर सिस्टीम्स, या कंपनीने बनविलेले ‘Ambulance.run’ हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ॲप आहे. आमदार नरेंद्र पवार, ॲम्ब्युलन्स डॉट रनचे संचालक हेमंत ठाकरे याप्रसंगी उपस्थित होते.
या ॲपद्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. काही क्लिकद्वारे आपल्या जवळील ॲम्ब्युलन्स शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे ॲप वापरकर्त्याला सहाय्य करेल.
वापरकर्त्याची सद्यस्थिती हेच त्याचे आपत्कालीन किंवा पिक अप लोकेशन गृहीत धरले जाईल. तुमचा मित्रपरिवार आणि कुटुंबाअंतर्गत असलेल्या आपत्कालीन संपर्कासोबत तुमची आपत्कालीन माहिती शेअर केल्यानंतर ते तुमच्या ॲम्ब्युलन्सची सद्यस्थिती जाणून घेतील. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात सहाय्यक ठरेल असे आमदार पवार म्हणाले. ‘Ambulance.run’ सद्यस्थितीला २५०हून अधिक रूग्णवाहिका ऑपरेटर त्याचबरोबर ३६० हून अधिक ॲम्ब्युलन्सबरोबर कार्यन्वित आहे. हे ॲप Google plystore वर उपलब्ध आहे.