अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतरांना पेट्रोल दिले

0

पेट्रोलपंप मालकासह कर्मचार्‍या विरोधात गुन्हा

जळगाव : कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराची मालिका तोडण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संचारबंदीत शासकीय व्यवस्थापनात काम करणारे व अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या व्यक्तींनाच संबंधित सेवेबाबत किंवा कामाबाबतची पास उपलब्ध करुन दिल्यानंतर पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे आदेश आहे. असे असतांनाही अत्यासेवेव्यतिरिक्त इतरांनाही पेट्रोल देणार्‍या पेट्रोलपंप मालक मनोज काबरा, मनोज काबरा तसेच तेथील महिला कर्मचारी साधना लाडंगेसह दुचाकी मालक आनंदा पाटील अशा तिघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीस्वाराला पकडले अन् प्रकार उघड

संचारबंदीदरम्यान जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, पोलीस कॉन्सटेबल अविनाश देवरे, सहाय्यक फौजदार भटू नेरकर, पोलीस कॉन्सटेबल छगन तायडे, होमगार्ड योगेश कोष्टी, होमगार्ड स्वप्नील निकम असे कर्मचारी आकाशवाणी चौकात शनिवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत होते. सायंकाळी 06.30 वाजता या चौकात दुचाकी क्रमांक एम.एच.19 ए.के.2965 आली असता पोलिसांनी थांबविले. पेट्रोल भरण्यासाठी गेलो होतो, असे उत्तर दुचाकीवरील चालकाने दिले. याबाबत पासची विाचारणा केल्यावर पंपावर ओळख होती म्हणून पेट्रोल मिळाले,असे उत्तर दुचाकीस्वार आनंदा गोविंदा पाटील (गणेशनगर) यांनी दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह काबरा पंपावर धाव घेतली. त्याठिकाणी प्रकार समोर आला. याप्रकरणी पंपमालक काबरा, येथील महिला कर्मचारी साधना लांडगे तसेच दुचाकी ग्राहक आनंदा पाटील यांच्या विरोधात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा जिल्हापेठ पोलिसात दाखल केला.