जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे : कारखान्यांना परवानगी देण्यासाठी समिती गठित
जळगाव : जिल्ह्यात सर्व कारखाने लॉक डाऊन करण्याचे आहेत. यात सर्व दुकाने, कारखाने बंदचे आदेश आहेत. असे असले तरी गरज लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात जीवनावश्यक, अत्यावश्यक वस्तू, सेवा संबंधित उद्योग, कारखाने, कंपन्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत.
अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तू, कारखाने सुरू करण्याबाबत संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनांना कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आदेश देण्यात आले आहे. ते कारखाने सुरू करण्यासाठी संबंधितांना परवानगी देण्यासाठी सहा जणांची समिती गठित करण्यात आली आहे.
अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंचे कारखाने सुरू करण्यासाठी समितीला आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कारखानदारांनी योग्य ती परवानगी घेऊन तातडीने कारखाना सुरू करावेत असे आदेशित करण्यात आले आहेत.
परवानगी देण्यासाठी जिल्हास्तरावरील समिती अशी
अध्यक्ष-विशेष भूसंपादन अधिकारी-नोडल अधिकारी, सदस्य सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन, सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन, उपअभियंता, एमआयडीसी, सदस्य सचिव-जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक.