जळगाव । शिक्षण प्रसारक मंडळ व गुरुवर्य अॅड.अत्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अॅड.अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीअम स्कूलच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते 29 जून रोजी पार पडला. सदर कार्यक्रम कै. अॅड. अच्युतराव अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात व उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे स्वागत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. वि.वि. दावलभक्त यांनी केले.
यांचा झाला सत्कार
कै. अ.वा. अत्रे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड.अशोक माथुरवैश्य यांचे स्वागत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. विजय दावलभक्त यांचे स्वागत शिक्षण प्रसारक मंडळ चिटणीस अभिजीत देशपांडे यांनी केले तर गनी मेमन यांचे स्वागत अॅड. सुशीलजी अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. शि.प्र.मंडळ विश्वस्त कार्यकारिणी सदस्य व बांधकाम विभाग प्रमुख प्रेमचंद ओसवाल, सपन झुनझुनवाला यांचा सत्कार व.प.न.लुंकड शाळेच्या विद्यार्थीनींना गणवेश वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
विचार बदला नशिब बदलेल
जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ‘विचार बदला नशिब बदलेल’ या विचारातून शिक्षणावर अधिक भर द्यावा ज्यातून आपल्या विचारातून खुप मोठे बदल आपण घडवू शकतो असे नमूद करुन संस्थेच्या यशस्वी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्यात यानंतर प.न.लुंकड कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव यांनी कै. अॅड. अ.वा. अत्रे (बाबा) यांचे जीवनावर काव्य सादर केले.
उपक्रमांची दिली माहिती
अॅड. अशोक माथुरवैश्य व विजय दावलभक्त यांनी संस्थेशी असलेले संबंध, प्रगतीची वाटचाल याचा विशेष उल्लेष केला.पी.पी.टी. प्रेझेंटेशन अंतर्गत शाळेच्या वाटचालीतील उपक्रम व योगदान, शाळेची प्रगती, वाटचालीचे प्रास्ताविक कै. अॅड. व.वा. अत्रे इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका प्रीती झारे व कु. सुषमा जोशी यांनी सादर केले. सूत्रसंचालन सानिफा पंचभाई यांनी केले. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थीनींची उपस्थिती होती. तसेच विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली.