अथक प्रयत्नानंतर कर्मचार्‍यांना सापडला दूषित पाण्याचा स्रोत

0

तळोदा । तळोदा शहरातील दत्तमंदिर, काकाशेठ गल्ली आदी परिसरात मागील 3 महिन्यांपासून होत असलेल्या दूषित पाण्याच्या स्रोत शोधण्यासाठी पालिका कर्मचार्‍याचा नाकी नऊ आले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर पालिकेच्या कर्मचार्‍यांना दूषित पाण्याचा स्रोत ज्या ठिकाणी आहे ते शोधण्यात यश आले आहे. उशिरा का होईना पण समस्यांचे निराकरण झाले, त्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाईप लाईन खोदण्याच्या निर्णय : दूषित पाण्याच्या स्रोत शोधण्यात अनेक दिवस उलटूनही शोध लागत नसल्याने अखेर परिसरतील संपूर्ण पाईप लाईन खोदण्याच्या निर्णय पालिकेने घेतला. अखेर पालिकेच्या कर्मचार्‍यांच्या अथांग प्रयत्नानंतर यश प्राप्त झाले, शहरातील श्रीराम मंदिरासमोर डॉ. गणेश सोनावणे यांचे जुने नळ जोळणी कनेक्शन परस्पर कट करुन ते बंद न करता उघडे सोडल्यामुळे गटाराचे पाणी त्या पाईपात शिरुन दत्त मंदिर व काकाशेठ गल्ली आदी परिसरात उतार भाग असल्याने संपूर्ण परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे पाणी पुरवठा कर्मचार्‍यांच्या काल निदर्शनास आले.

सातत्याने पाठपुरावा : आरोग्य सभापती गौरव वाणी यांनी सातत्याने पाठपुरावा करुन पालिकेच्या कर्मचार्‍याच्या मदतीने दूषित पाण्याच्या स्रोत शोधत होते अखेर काल त्यांचा प्रयत्नांना यश आले आहे. या कामात पाणी पुरवठा विभागाचे अभियंता ठाकुर, गोरख जाधव, दिलीप बाविस्कर, जीवन परदेशी, सुरेश माळी यांनी खूप मेहनत घेऊन दूषित पाण्याचा स्रोत शोधून काढल्याने नगराध्यक्षा रत्ना चौधरी, मुख्याधिकारी जनार्धन पवार, पाणी पुरवठा सभापती सतीवन पाडवी यांनी त्यांचे आभार मानले.

तक्रारींमध्ये झाली होती वाढ
तळोदे शहरातील काकाशेठ गल्ली, दत्त मंदिर परिसरांसह गावात ठिकठिकाणी दुषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये मागील काळात वाढ झाली होती. दूषित पाणी पुरवठा स्रोताचा शोध घेण्यासाठी पालिकेकडून ठीक ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. तरीही दूषित पाण्याच्या शोध लागत नसल्याने, पालिकेच्या विशेष निधीतून खान्देशी गल्ली ते दत्त मंदिर परिसरातील पाईप लाईन बदलण्यात आली होती. परंतु पाईप लाईन बदलूनही दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊन विविध परिसारातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.