चिंचवड : श्रीमन महासाधु श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन सोहळ्या निमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट व संस्कृती संवर्धन विद्यमाने आयोजित सामुहिक अथर्वशीर्ष पठणासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी तीन ते चार हजार भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गायत्री यज्ञाने झाली. राजेंद्र देसले व डॉ. अजित जगताप यांनी पौरोहित्य केले. यज्ञामध्ये रामकृष्ण लांडगे, सुरज पाटील यांनी सहभागी होऊन पूर्णाहुती दिली. कार्यक्रमास ज्ञानप्रबोधिनी, न्यु इंग्लिश स्कूल च्या विध्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाची 21 आवर्तने म्हटली. विघ्नहरी देव महाराज, मंदार देव महाराज, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, करूणाचिंचवडे व महासंघाचे रविकांत कळंबकर यांनी दिप पुजन केले. प्रास्ताविक ह.भ.प.किसनमहाराज चौधरीनी तर स्वागत रवि कळेकर नितीन शिंदे यांनी केले