जळगाव । अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा मानाचा समजला जाणारा उत्कृष्ठ ग्रंथ निर्मिती पुरस्कार अथर्व पब्लिकेशन्स् जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या ‘फर्मान आणि इतर कविता-आशय आणि आस्वाद’ संपादक प्रा.डॉ.तुषार चांदवडकर या पुस्तकास मिळाला. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वार्षीक पारितोषीक वितरण समारंभ मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 150च्या वर प्रकाशक सहभागी झाले होते वरील कार्यक्रमात अथर्व पब्लिकेशन्स् ला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
महाराष्ट्रातील नामवंत समिक्षक माजी सम्मेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सुप्रसिध्द लेखक भानु काळे तसेच परचुरे प्रकाशन मंदिर मुंबईचे अप्पा परचुरे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष शकुंतलाबाई उपाध्ये, कार्यवाह नितीन गोगटे उपस्थित होते.