अदित्य ठाकरे अध्यक्षपदी

0

मुंबई । मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या निवडणुकीत अदित्य ठाकरे यांच्या गटाने बाजी मारली. संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या 27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 37 उमेदवार सहभागी झाले होते. या निवडणुकीत अदित्य ठाकरे यांना सर्वाधिक 147 मते मिळाली. निवडणुकीआधीच अदित्य ठाकरे यांना चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आले होते. त्यामुळे संघटनेच्या प्रमुखपदाची औपचारीक घोषणा होणे बाकी आहे.