अदिनाथ जैन स्थानकात युवा संमेलन

0

बिबवेवाडी : नवकार अराधिका प.पू. प्रतिभाकंवरजी म.सा.यांच्या सानिध्यात आदिनाथ जैन स्थानकात दोन दिवसीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे दोन हजारहून अधिक युवक शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत.

16 व 17 सप्टेंबर रोजी होणार्‍या शिबिरामध्ये 16 तारखेला कमल अचलिया व प्राध्यापक समेश दलाल यांचे मार्गदर्शन होणार आहे.
17 तारखेला डॉ. सुहास हरदास यांचे मार्गदर्शन शिबिर होणार आहे. युवा संमेलनाला राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर भेटी देणार आहेत.
शिबिराच्या आयोजनासाठी आदिनाथ संघाचे अध्यक्ष डॉ. धनराज सुराणा, राजश्री पारख, विजय भंडारी, अभय छाजेड, अनिल नहार, विजय नवलाखा, अजिंक्य चोरडिया, संजय सांकला, हरसुख बोरा, रमेश नवलाखा, अजित डुंगरवाल, मनोज लुंकड यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी तसेच पुण्यातील अनेक जैन संस्था व त्यांचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.