अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह सुरक्षा रक्षक नेमा

0

रावेरला बँक अधिकार्‍यांच्या बैठकीत पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे

रावेर- तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या अनुषंगाने रावेर पोलिस ठाण्यात सोमवारी शहरातील बँकांच्या व्यवस्थापकांना बँक सुरक्षिततेबाबत उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच अलार्म व शस्त्रधारी सुरक्षा रक्षक ठेवण्यात यावे, सीसीटीव्हीच्या नजरेत रस्त्यांचा समावेश करावा आदींबाबत सुचना देण्यात आल्या तसेच सतर्क राहण्याच्या सूचना रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी बँक व्यवस्थापकांना दिल्या.

यांची होती उपस्थिती
अ‍ॅक्सिस बँक मॅनेजर दीपक पाटील, युनियन बँक मॅनेजर शशिकांत पाटील, देना बँक मॅनेजर प्रवीण बोरोले, रावेर पीपल्स बँक मॅनेजर प्रकाश पाटील, स्टेट बँक व्यवस्थापक एस जी.रानवले, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक राजेश कुमार, जळगाव जनता बँक व्यवस्थापक अनिल बंब, आयसीआयसीआय बँक व्यवस्थापक ऋषिकेश गव्हाणकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सुनील कुमार, कॅनरा बँकेचे जी.वी.भालेराव, बुलढाणा अर्बन बँक, जळगाव पीपल्स बँकेचे श्रीपाद जोशी, एचडीएफसी बँकेचे नरेंद्र परदेशी, यासह शहरातील बँकांचे व्यवस्थापक बैठकीला उपस्थित होते.