जळगाव। महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत विकास आराखडा (डिपी)करण्यासाठी विशेष गट घेणे, ओपन प्लेस तसेच स्वच्छता अभियानाच या कामांवरुन खडाजंगी झाली. सभेतील 21 प्रस्तावांपैकी सुमारे 4 प्रस्ताव तहकूब करण्यात आलेत. कैलास सोनवणे यांनी टीडीआर घोटाळ्याबाबत केलेल्या ठरावावर प्रशासनाने काय कारवाई केली असा प्रश्न विचारला. त्यावर आयुक्तांनी जागा मालकाकडून व्याजासह वसुली करीत आहे. तसेच शासनाला चौकशी करुन याबाबत कारावाईसाठी पत्र दिल्याचे सांगीतले. सभेत राजू पटेल यांनी आरोग्य विभाग, कोंडवाड्याचा मक्तेदार यांच्या माध्यमातून शहरात गुरांची तस्करी सुरु असल्याचा आरोप सभेत केला. यावर महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेत. तसेच मक्तेदार बदलविण्याची सूचना केली. ज्योती चव्हाण यांनी मोकाट कुत्र्यांची समस्या मांडली. कैलास सोनवणे यांनी चेन्नई येथिल संस्थेकडून काम करण्याचे सूचविले. ही सभा महापालिकेच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर ललित कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते.
अनंत जोशी, महापौरांमध्ये शाद्बीक चकमक
महापालिकेचा जुन्या हद्दीच्या विकास आरखड्याची मूदत संपली असल्याने नविन डिपी तयार करण्यासाठी विशेष गट मागविण्याच्या विषयावर भाजप गटनेते सुनिल माळी यांनी विरोध केला. अर्थिक परिस्थिती बिकट असतांना कोट्यावधी रुपये खर्चाचे प्रयोजन का ? असा सवाल त्यांनी केला. या विषयावरुन त्यांची महापौर लढ्ढा यांच्याशी शब्दिक वाद झाला. हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. सागर पार्कच्या जागेचे टीपीचे व डिपीचे आरक्षण वेगळे असल्याने त्यात फेबदलाच्या विषयावरुन मनसेचे अनंत जोशी आक्रमक झाले होते. हा विषय कोण्याच्या सांगण्यावरुन आला असे म्हणत जोशी यांनी संताप व्यक्त केला. भाजपाचे रविंद्र पाटील यांनी यात मोठा घोटाळा असून संकुल बांधण्याचा व मुळ मालकास फायदा पोहचविण्याचा हेतू असल्याचा आरोप केला. अनंत जोशी यांनी सागर पार्कवरील आरक्षण बदविता येत नसतांना नगररचनासहाय्यक बागुल यांना आरक्षणात फेरबदल केला तर त्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. कैलास सोनवणे यांनी देखील असे करु नका म्हणत अधिकार्यांनी अभ्यास करण्याच्या सूचना केल्यात. हा विषय तहकूब ठेवण्यात आला. महापौर लढ्ढा यांनी यात असे काही नसल्याचे संतापात म्हटले. यावर जोशी यांनी तुम्ही का चिडक आहे, हा विषय तुम्ही आणला का म्हटले यावरुन जोशी व महापौरांमध्ये शाब्दिक वाद झाला.संस्थांना दिलेल्या ओपन प्लेसचा नियमबाह्य व्यावसायिक वापर होत असल्याने त्यांचे ठराव रद्दच्या विषयावर जर संस्था अश्या करीत असतील त्यांना चारपट कर आकारावे अशी सूचना खाविआने केली. त्यास पुथ्वीराज सोनवणे, अॅड. सुचिता हाडा यांनी विरोध केला. यावरुन रमेश जैन संतप्त झाले. त्यांनी हा विषय अमान्य असल्याचे सांगीतले. दरम्यान, सूचिता हाडा यांनी ख्वॉजामिया जागेवर हॉकर्संचे पुर्नवसनास विरोध दर्शविला. भविष्यात या हॉकर्सचे स्थलांतर करणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी बनेल असे सभागृहात सांगितले. भविष्या या जागेवर विकास करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येतील असे मत हाडा यांनी मांडले.
कोंडवाडा ठेका रद्द
राजू पटेल यांनी कोंडवाड्यातील गुरांचा तस्करी होत असल्याचा आरोप केला. तसेच कोंडलेल्या गुरांना दोन दोन तीन तीन दिवस मक्तेदारांकडून चारा पाणी दिला जात नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सद्याच्या मक्तेदाराचा ठेका रद्द करावा अशी सूचना मांडली. यावर हा मक्तारद्द करून चांगल्या सेवाभावी संस्थेला मक्ता देण्याचा प्रस्ताव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर ज्योती चव्हाण यांनी मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असल्याचे सांगितले. सुट्यांचा काळ असल्याने लहान मुलांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याच निदर्शनास आणून दिले.
आरोग्य अधिकारींच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
सदाशिव ढेकळे यांनी शौचालय बांधण्याचे अर्ज पडून असून आरोग्य अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप केला. तसेच सार्वजनिक शौचालय चार चार दिवस साफ होत नसल्याचे ढेकळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ढेकळे यांनी काही नागरिकांनी वैयक्तीक शौचालयाची मागणी करूनही त्यांना शौचालयाचे अनुदान दिले जात नसल्याचे सांगितले. यावर आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी एकही अर्ज पडून नसल्याचे सभागृहास सांगितले. सदस्य तक्रार करीत असतांना डॉ. पाटील व्यवस्थित उत्तर देत नसल्याने किशोर पाटील यांनी आरोग्य अधिकार्यांचा कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत कर्तव्यदक्ष माणसाची नियुक्ती करा अशी सूचना मांडली.