मुख्य अधिकारीच रजेवर, प्रत्येकाची कारणे निराळी
पिंपरी : सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचकच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या अनेक अधिकारी विविध कारणे सांगत रजा उपभोगत आहेत. अधिकार्यांमध्ये आलेली ही रजांची लाट थोपविण्याचे आव्हान पदाधिकार्यांसमोर आहे.
सह आयुक्त दिलीप गावडे प्रदीर्घ वैद्यकीय रजेवर आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सह आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे दिला आहे. तसेच प्रशासन अधिकारी आणि ’ब’ प्रभागाचे प्रभारी क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत हे देखील रजेवर आहेत. त्यांच्याकडील पदभार प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट यांच्याकडे देण्यात आला आहे. क्रीडा व विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि ’फ’ प्रभागाचे प्रभारी क्षेत्रिय अधिकारी मनोज लोणकर रजेवर आहेत. त्यांच्याकडील ’फ’ क्षेत्रिय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर यांच्याकडे दिला आहे. तर, क्रीडा विभागाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी राजेश जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.