जळगाव : महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेरणीची पाहणी करावी, तसेच वस्तुस्थितीची सातबाऱ्यावर नोंद करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिल्या. आज ते जळगाव दौऱ्यावर आहे.
जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांचा आढावा तसेच विद्यापीठ नामविस्तार आनंद सोहळा व नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे जळगावात आले आहेत. या वेळी नियोजन भवनात जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त करीत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती असल्याचे सांगितले. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून जिल्हा देशात पहिला आणण्यासाठी प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.