मुंबई: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या चार-पाच दिवसांपासून होम क्वारंटीनमध्ये आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अजित पवारांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान आज सोमवारी २६ रोजी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांची कोरोनाचाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’ असे अजित पवारांनी म्हटले आहे.
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020