नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सामान्य नागरिकांपासून सेलीब्रेटी, राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. स्वत: अमित शहांनी कोरोनाचे लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार झाला असून उपचारानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आली आहे. स्वत: अमित शहा यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.
आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
२ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर उपचार झाला असून ते आता निगेटिव्ह आले आहेत. लवकरच त्यांची रुग्णालयातून सुट्टी होणार आहे. आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मी ईश्वराचे आभार मानतो, आणि याकाळात माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्लेने काही दिवस घरीच राहणार आहे असे अमित शहा यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
कोरोना संक्रमण से लड़ने में मेरी मदद करने वाले और मेरा उपचार करने वाले मेदांता अस्पताल के सभी डॉक्टर्स व पैरामेडिकल स्टाफ का भी आभार व्यक्त करता हूँ। @medanta
— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
दरम्यान ९ ऑगस्टला दिल्ली भाजपाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी अमित शहांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी झालेली नव्हती, मनोज तिवारी यांनी चुकीची माहिती दिल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केले होते.