अधिकृत: ‘आप’ ५५ तर भाजपला १५ जागांवर आघाडी !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले आज मंगळवारी ११ रोजी मतमोजणी होत आहे. दिल्ली राजधानीची निवडणूक आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. मतमोजणीत सुरुवातीपासून आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. दिल्ली निवडणूक आयोगाने वेबसाईटवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ११ वाजेपर्यंत आम आदमी पक्ष ५५ तर भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे.

५१ टक्के दिल्लीकरांची ‘आप’ला पसंती
सकाळी १०.३० वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीची आकडेवारी दिल्ली निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाला ५१ टक्के तर भाजपला ४० टक्के मते मिळाली आहे. कॉंग्रेसला ५ टक्केही मत मिळताना दिसत नाही.

केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ५५ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजप १५ जागांवर आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसला मात्र एकाही जागांवर आघाडी घेता आलेली नाही. २०१५ मध्ये भाजपला ३ जागांवर विजय मिळाले होते.