पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी १२.३० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २४३ जागांचे कल हाती आले आहे. त्यापैकी १२७ जागांवर एनडीएला बहुमत आहे तर १०५ जागांवर तेजस्वी यादव यांनी आघाडी मिळवली आहे. अद्याप निकाल स्पष्ट नाही. मात्र एक्झिट पोल खोटे ठरताना दिसत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु आरजेडीची अद्याप आशा कायम आहे. भाजप ७२, आरजेडी ६५, जेडीयू४७ , कॉंग्रेस २१ जागांवर आघाडीवर आहे.