नवापूर। अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, देवगिरी प्रांत नंदुरबार नवापुर तालुका अध्यक्षपदी अॅड. जितेंद्र दुसाणे यांची निवड करण्यात आली तर अॅड. अतुल कुलकर्णी यांची महामंत्रीपदी निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे कोर्टचे सरकारी वकील श्री वाघ होते. तसेच विशेष मार्गदर्शन अॅड. सुबोध वाणी व अॅड.पंडित सर यांनी केले.
संघाचे काम हे एक निष्ठ पद्धती ने करावे व सर्व जाती व समाजातील लोकांना कायद्याची मदत करणे या बाबत विशेष मार्गदर्शन राजू गावित यानी केले. चीनी वस्तू न वापरणे बाबत देशपांडे सर यांनी माहिती सांगितली. आभार सिसोदिया वकील यांनी मानले. यात नंदुरबार जिल्हातील सर्व वकील परिषदेला हजर होते.