अधिवक्ता शहादा तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड.अमोलकुमार गुगालेंची नियुक्ती

0

नंदुरबार। अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या शहादा तालुका अध्यक्षपदी शहादा येथील प्रसिद्ध विधीज्ञ अ‍ॅड. अमोलकुमार डी. गुलाले यांची तर तालुका महामंत्रीपदी अ‍ॅड. विठ्ठल पथारिया यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय अभिवक्ता परिषद, देवगिरी प्रांतची जिल्हास्तरीय बैठक नंदुरबार येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांतचे सहमंत्री अ‍ॅड. समीर पंडित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे न्यायालयातील जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. आधार एस. वाघ, परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुबोध वाणी व महामंत्री अ‍ॅड. भरत मराठे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. समीर पंडित यांनी अभिवक्ता परिषदेची स्थापना व तीचे महत्त्व विषद करून ‘न्यायः मम धर्मः’ या तत्वाने परिषदेचे कामकाज चालते असे सांगत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा याकरिता परिषदेच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. या बैठकीत सर्वानुमते शहादा तालुक्यासाठी परिषदेच्या तालुकाध्यक्ष व महामंत्रीपदाची घोषणा करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष उर्वरित कार्यकारिणीची निवड करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा व धडगाव तालुक्यातील उपस्थिती होती.