अधिवेशनाच्या तयारीसाठी रिपाइंची बैठक

0

चाळीसगाव । रिपाई (आठवले गट)चे 25 ते 27 मे दरम्यान पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी रिपाईची बैठक पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 31 मे रोजी भुसावळ दौर्‍यावर असून त्यांच्या या दौर्‍यासंदर्भातही या बैठकीत नियोजन करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रामेशजी मकासरे, उत्तर महाराष्ट्र सचिव रवींद्रनाथ तायडे, खान्देश विभाग अध्यक्ष लक्षीमन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,रिपाइंचे जळगाव लोकसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख, चाळीसगाव नगरपरिषदचे नगरसेवक आनंद जी.खरात यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली.

नियुक्तीपत्र देऊन सत्कार
तालुका सहसचिव अनिल वाणी,संजय जाधव, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील,समाधान मोरे, संघटक विजय मरसाळे, समाधान खैरे,सल्लागार रामदास शिंदे दिलीप निकम, उपाध्यक्ष अविनाश रणधीर,गजानंद बागुल,सचिव हेमंत सोनवणे,संघटक खुशाल बिडे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष छोटू बागुल शहर अध्यक्ष सुरेश भालेराव, कार्याध्यक्ष तन्वीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा संघटक गोविंद सोनवणे, ज्येष्ठ नेते भगवान राजपूत, सुपडू मोरे, अंबादास जगताप, शिवाजी पाटील,रिपाई बहुजन विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष धर्मजित खरात, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष रोशनअल्ली सैयद, कार्याध्यक्ष शाब्बार खान युनूसखान, मुकेश भालेराव उपस्थित होते. दशरथ वाघ, श्रवण जगताप, नामदेव पगारे, काकासाहेब मोरे, विकास त्रिभुवन, शरीफ पिंजारी, जगन चव्हाण,किसन रनधिवे, भास्कर मोरे, भारत भालेराव, आशपाक शेख, सोपान अहिरे, बजरंग भालेराव,सावळेराम जगताप,निबाजी अहिरे, धना वाघ,युवराज यशोदा,अरुण भालेराव, रहीम सलूद्दीन रवींद्र सरोदे, सुभाष भालेराव,यांच्य सह अविनाश पटावकर,विजेंद्र खरात, अजिंके त्रिभुवन, अनु रणधीर, आकाश रणधीर, संदीप रणधीर, सुनंद खरात, राहुल वाकुडे, गणेश शिरसाट, साईनाथ वाकुडे, बाबाजी शिरसाट, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.