विधानसभा अध्यक्षांसह ३५ आमदारांना कोरोनाची लागण
मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोनामुळे केवळ दोन दिवसांचेच हे अधिवेशन आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात विधानसभा अध्यक्षांसह ३५ आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यानंतर अधिवेशानानिमित्त करण्यात आलेल्या चाचणीत अनेक आमदार पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्यासच विधान भवनात प्रवेश दिला जातो आहे, मात्र आज अधिवेशनाला सुरुवात होत असतांना अनेकांचे रिपोर्ट प्राप्त झालेले नाही, त्यामुळे विधानभवन परिसरात गोंधळ उडाला आहे. हा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. त्यानंतर अजित अपवर यांनी प्रशासनाला तातडीने रिपोर्ट मागवून घेण्याचे आदेश दिले.
दोन दिवसांपूर्वी मतदारसंघात वैयक्तिक कोरोना चाचणी केलेली आमदारांना निगेटिव्ह असतानाही प्रवेश दिला जात नव्हता, हा प्रकार अजित पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. दोन दिवसांपूर्वी चाचणी केलेली आहे, त्यांना प्रवेश द्या अशा सूचना अजित पवारांनी केल्या.