अधिष्ठातांच्या निवासस्थानासमोरील विभागाचे स्टोअर रुम फोडले

0

जिल्हा वैद्यकिय महाविद्याल आवारातील घटना ः 12 हजार रुपयांच्या वस्तू लांबविल्या

जळगाव – जिल्हा रुग्णालय आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या निवासस्थानासमोरील आरोग्य विभागाचे स्टोअर रुम फोडून अज्ञात चोरट्यांनी 800 किलो वजनाचे 12 हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभियंत्यामुळे प्रकार आला समोर

शहरातील पारक नगर येथे विजय राजेंद्र नारखेडे (वय-37)हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यशाळेचे (आरोग्य सेवा) सेवा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 13 जानेवारी रोजी 3 वाजेच्या सुमारास नारखेडे हे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारातील अधिष्ठाता यांच्या निवासस्थानासमोर असलेले आरोग्या वर्क शॉपचे स्टोअररुमकडे प्रसाधनासाठी गेले होते. यावेळी त्यांना स्टोअर रुमचे फळ्या तोडलेल्या अवस्थेत दिसल्या. नारखेउे यांनी हा प्रकार सहकारी कर्मचारी सुभाष प्रजापती यास सांगितला. यानंतर दोघेही जिल्हा शल्यचिकित्सकांकडे गेले. व त्यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यावर स्टोअर रुममधील जुने निरुपयोग साहित्य चोरीस केले असल्याचे दिसून आले. यानंतर नारखेडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय लांबविला ऐवज

चोरट्यांनी स्टोअररुममधून 13 नग कैची, 264 नग सस्पेशन बुश, टाय रॉड एन्ड सेट 80 नग, बालॅ जॉईट 140 नग, व्हिल बेरींग 80 नगर, बे्रक डिक्स 12 नग, बे्रक पँड 148 नग, व्हिल सिलेंडर असेंब्ली, 24 नग, क्लच सेट 12 नग, प्रेशर प्लेट 12 नग, वॉटर पम्प, 15 नग, बुश्टर 1 नग, जॉईट क्रॉस 14 नग, स्टेशनर असेब्ली 17 नग, स्टेशनर बेअरींग 44 नग, क्लच सिलेंडर 12 नग, शॉकप असाबल 12 नग, स्ट्रट असेंबली 03 नग, सेंटर रींग असेंबली, 21 नग असे 800 किलो वजनाचे 12 हजार रुपये किमतीचे साहित्य लांबविले आहे. याप्रकरणी विजय नारखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.