जळगावचा तरुण… कोलकत्याच्या तरुणी… अधुरी प्रेमकहाणी…

0

जळगाव : ते म्हणतात ना… प्रेमाला सीमा नसते याचाचा एका घटनेवरुन नुकताच प्रत्यत आला आहे. दोन वर्षापूर्वी जळगावच्या तरुणाची कोलकत्याच्या 19 वर्षीय तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होवून प्रेम बहरल. तरुणीसाठी तरुण जळगाव सोडून कोलकत्याला पोहचला. याठिकाणी तरुणी व तरुण यांच्यात लग्नाचे नियोजनही सुरु झाले, मात्र त्यापूर्वीच जळगावच्या तरुणाच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा कोलकत्यात पोहचले. एकीकडे पोलीस अन् दुसरीकडे पळून लग्न करण्याचा प्रसंग या दोन्ही गोष्टींमुळे तरुण तरुणीच्या स्वप्नांचा फुगा फुटला, बदनामी, कुटुंबियांचा विश्‍वासघात यांची जाणीव होता दोघांनी आपआपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतल्याने ही प्रेमकहाणी अधुरी राहिली.

शहरात रामानंदनगर परिसरात प्लंबर असलेल्या 21 वर्षीय तरुण फेसबुकमुळे कोलकत्ता येथील तरुणीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये संपर्क वाढला, यानंतर मैत्री आणि मैत्रितून प्रेमप्रकरण चांगलेच बहरले. केवळ फेसबुक एकमेकांना बघितलेल्या या दोघांना प्रत्यक्ष भेटीची ओढ झाली. कोलकत्ता ते जळगाव दुरचे अंतर पार करुन तरुणीला भेटायचे ठरले. तरुणीच्या घरी किस्सा माहित नसल्याने तिला बाहेर निघतांना असंख्य अडचणीं पार करुन बाहेर पडावे लागणार होते. यादरम्यान तरुणाने प्लंबरचे काम सोडून कापड व्यवसाय करण्याचाही निर्णय घेतला होता.

अन् अजमेरला झाली दोघांची पहिली भेट

कापड व्यवसायचा निर्णय घेतल्याने तरुणाने घरी सुरतला कापड खरेदीसाठी जावयाचे असल्याचे सांगितले. सुरतला पोहचेपर्यंत तरुण व तरुणीही दोघेही सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते. दोघांमध्ये भेटीचे नियोजन ठरले. ठरल्याप्रमाणे तरुणी व तरुणही राजस्थान राज्यातील अजमेर येथे पोहचले. अनेक दिवसानंतर प्रत्यक्ष या पहिल्याच भेटीचा दोघांचाही गगनात मावनेसा असा आनंद होता. याचठिकाणी एका हॉटेलात मुक्काम करत दोघेही लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचले. येथून कोलकत्याला चल, आई, वडीलांना भेटू, ते लग्नाला होकार देतील, असे तरुणीने तरुणाला सांगितले, अन् त्यानुसार दोघेही कोलकत्त्याला पोहचले. दरम्यान अनेक दिवसांपासून तरुणाचा संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तरुणाच्या शोधार्थ पोलीस कोलकत्यात

पोलिसात नोंद झाल्यानुसार त्याची पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्याकडून दखल घेण्यात आली. त्यांनी तरुणाच्या तपासासाठी सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी व भुषण पाटील या दोघांचे पथक तयार केले. प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेपर्यंत पोहचल्याने पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनीही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा केली. रामानंदनगर पोलिसांच्या मदतीला हवालदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे या दोघांना रवाना केले. तरुणही कोलकत्यात असलयचे निष्पन्न झाल्याने पथक त्याठिकाणी पोहचले व तेथून तरुणाला ताब्यात घेतले.

संघर्षाची जाणीव होताच दोघेही आपआपल्या घरी परतले

कोलकत्याला पोहचल्यावर तरुणी आई, वडीलांना राजी करते, असे सांगून तरुणाला तिच्या मावशीकडे सोडून गेली. तरुण काही दिवस याठिकाणी थांबला. तरुणी कुटुंबियांना राजी करते तोच तरुणाच्या शोधार्थ जळगाव पोलिसांचे पथक याठिकाणी धडकले. एकीकडे पोलीस दुसरीकडे कुटुंबियांचे मन वळविण्यात अपयशी ठरलेली तरुणी. अशा इकडे आड तिकडे विहिरी याप्रमाणे तरुण संकटात सापडला. कुटुंबाची समाजात बदनामी, आपल्या चुकीमुळे त्यांना मिळणारी वागणूक याची जाणीव दोघांना झाली आणि दोघांनी झाले गेले विसरुन आनंदाने आपआपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सिनेस्टाईल कथानकाप्रमाणे दोघ