भामा आसखेड । दत्तु भोकसे यांची कुरकुंडी सोसायटीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी संजय भोकसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. 13 जागांपैकी 12 जागेकरीता मतदान झाले होते. यामध्ये अपक्षांनी बाजी मारत 7 जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कुरकुंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी दत्तु भोकसे व उपाध्यक्षपदासाठी संजय भोकसे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. साबळे यांनी घोषित केले. चिंधु भोकसे, विठ्ठल भोकसे, उल्हास भोकसे, काळुराम ढोरे, शिवाजी भोकसे, रोहिदास आवळे, दत्तात्रय भोकसे, महिला राखीव जागेसाठी नंदा काळे, गऊबाई भोकसे, प्रकाश वाघमारे आदी सोसायटीचे संचालक उपस्थित होते.