अध्यक्षपदी नितीन हाजबे

0

दौंड । वासुंदे गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नितीन एकनाथ हाजबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते नितीन हाजबे यांच्या नावाला समंती देण्यात आली आहे. गावातील तंटे मिटवून सर्वांना समान न्याय देण्यासाठी व गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. तसेच माझ्यावर गावाने टाकलेल्या जबाबदारीस सार्थ ठरवीन, असे तंटामुक्ती समितीचे नूतन अध्यक्ष हाजबे यांनी सांगितले. आत्तापर्यंतच्या अध्यक्ष निवडणुकीचा विचार केला तर प्रथमच बिनविरोध आणि सर्वसंमतीने विनावाद निवड होण्याचा हा योग वासुंदे गावात घडून आला. याप्रसंगी सरपंच नंदा प्र.जांबले, उपसरपंच दिलीप जगताप, गोरख जांबले, सतीश जांबले, गोरखभाऊ हाजबे, शहाजी जांबले, पोपट जगताप, दादन माकर, चंद्रकांत माकर, दिलीप जांबले, विनोद हाजबे, नितीन धुमाळ, दीपक भोईटे, विजय साळुंके, दीपक जांबले यांसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.