रावेर। बुद्धिमत्ता व आपल्या संस्कृतीच्या बळावर ब्राह्मण समाज यशस्वी ठरला आहे. भावी पिढीने सुध्दा अध्ययनाबरोबर आपली संस्कृती जपून यश संपादन करावे असे आवाहन इंदौरचे माजी अध्यक्ष राजेंद्र कानुगो यांनी केले. अध्यक्षस्थानी पंडीत जगदीश दुबे होते. येथील बाविसे गल्लीत बाविसा ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध क्षेत्रात यश, निवड झालेल्यांचा सत्कार कार्यक्रमात दुबे बोलत होते. यावेळी सनावद येथील आशिष कानुगो, वैशाली दुबे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर इंदौर समाजाचे माजी सचिव पंडीत मनोज व्यास, सचिव नरेंद्रकांत जोशी, अनिल शर्मा, प्रकाश जोशी होते.
गुणवंतांचा सत्कार सोहळा
विविध क्षेत्रात यश निवड, पदोन्नोती झालेले प्रदिप मिसर, प्रभुदत्त मिसर, प्रदिप वैद्य, कपील दुबे, पवन वैद्य, महेश जोशी, मानिष दुबे, रितेष दुबे यांचा गौरव करण्यात आला. तर समाजास सहकार्य करणारे हरिभाऊ दुबे व अतुल बाविसे यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी राजा मिसर, गोपाल दुबे, राजेंद्र पाठक, श्याम दुबे, यदुदत्त दुबे, यशवंत मिसर, रविंद्र जोशी, अशोक जोशी, विनोद जोशी, प्रकाश दुबे, जयप्रकाश शुक्ला, संतोष वैद्य, माहिला अध्यक्षा प्रिती दुबे, संध्या दुबे, ईशा वैद्य, ज्योती पाठक, ज्योती मिसर, प्रणिता मिसर, ज्योत्सना दुबे, कल्पना पाठक, मिनाक्षी मिसर यांसह समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप वैद्य, सुत्रसंचलन पुष्कराज मिसर तर आभार मनिष दुबे यांनी मानले.