धुळे। शहरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाच्या अध्ययन केंद्रास दलित, आदिवासी जनतेच्या सोयीच्या दृष्टीने महापालिका हद्दीत मध्यवर्ती ठिकाणी पर्यायी जागा देण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली निवेदनात म्हटले आहे की,सन 1981 मध्ये धुळे नगरपरिषदेने ठराव करुन कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्रास 420 चौ.फूट जागा दिली होती.
आता हे अध्ययन केंद्र काढण्यात आले आहे. मात्र या अध्ययन केंद्रास मनपाने पर्यायी जागा देण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.शासन आदेशाच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आयुक्तांनी पर्यायी जागा सूचविण्याबाबत कळविले होते.