अध्यापक विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

0

‘डॉ. कलाम यांची दशसूत्री’ या पुस्तकाचे झाले वाचन
जळगाव – केसीई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात प्राचार्य डॉ.ए.आर.राणेयांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात
आला. यावेळी कार्यक्रमाला डी.एल.एड. विभागप्रमुख प्रा. दुष्यंत भाटेवाल, प्रा.केतन चौधरी, प्रा.एच.टी.चौधरी, प्रा.एस.व्ही.झोपे,
प्रा.एस.एस.तायडे, प्रा.एस.एम.पाटील, डॉ.डी.एस.पवार, प्रा.किसन पावरा, जयश्री तळेले उपस्थित होते.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी मनीष बागुल, गायत्री झांबरे, नेहा पाटील ,वैशालीराजपूत, सुवर्णा सूर्यवंशी यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवना विषयीची माहिती व
‘डॉ. कलाम यांची दशसूत्री’ या पुस्तकाचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद कायनात,
प्रास्ताविक देवयानी जगताप तर आभार पूनम पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय चव्हाण, केतन चौधरी तसेच प्रथम
व व्दितीय वर्षाच्या डी.एल.एड. छात्राध्यापकांनी परिश्रम घेतले.


महावितरणतर्फे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

जळगाव – महावितरण परिमंडळातर्फे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत येथे उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस अधिक्षक अभियंता फारुख शेख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक वरिष्ठ व्यवस्थापक(लेखा) अमोल बोरसे, जयेश हिवाळे, कार्यकारी अभियंता (प्र) अविनाश राऊत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कृष्णराव शृंगारे, प्रणाली विश्लेषक विलास फुलजले, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक कोळी, धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.


मु.जे. महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
जळगाव – भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभाग आणि जनसंवाद आणि वृत्तपत्र विभागाच्या वतीने ’वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या विचारांचे अभिवाचन केले. यात प्रमोद राऊत याने ’एपीजेंची जडणघडण’, वर्षा उपाध्ये हिने ’प्रज्वलित मने’ या पुस्तकातील ’आदर्शांच्या शोधात’ या लेखाचे अभिवाचन केले. कविता वाचन शामल रामशे, निलेश लोहार, महेश सूर्यवंशी यांनी स्वरचित कविता सादर केल्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे., अब्दुल कलाम यांच्या जीवन व कार्याविषयी विद्यार्थ्याशी संवाद साधला. यावेळी प्रा. योगेश महाले, डॉ. अतुल पाटील व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. तर सूत्रसंचालन वर्षा उपाध्ये या विद्यार्थिनीने केले.जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागातर्फे वाचन प्रेरणा दिन आणि राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र वाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख प्रा.विश्वजीत चौधरी उपस्थित होते. मू.जे.महाविद्यालयात वृत्तपत्र पुरविण्याची सेवा देणारे रामचंद्र वाणी यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचा पुष्प व अजिंठा नियतकालिक देवून विद्यार्थिनी प्रियंका अहिरे हिच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागाचे प्रा. प्रशांत सोनवणे, केतकी सोनार उपस्थित होते.


महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते माल्यार्पण
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती असल्यामुळे जळगांव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकिय इमारत महापौर यांचे दालनात महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपमहापौर अश्विन सोनवणे, उपगटनेते राजेंद्र पाटील, उपायुक्त लक्ष्मिकांत कहार, कार्यालय अधिक्षक सुनिल गोराणे, महापौर यांचे स्विय सहाय्यक पुरुषोत्तम जोशी, सुनिल धुमाळ, राजेंद्र सुलाखे, राजेंद्र मराठे आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.


व.वा.वाचनालयातर्फे पुस्तक आपल्या भेटीला उपक्रम

शहरातील व.वा.जिल्हा वाचनालयातर्फे राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने ‘‘पुस्तक आपल्या भेटी’’ हा आगळा वेगळा उपक्रम जळगाव शहरातील विविध 10 ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन महापौर सिमाताई भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनीही आपल्या मनोगताची सुरूवात माझी माय सरसोती माय शिकवते बोली या बहिणाबाईच्या काव्यपंक्ती वाचनाने केली. तर ग्रंथालय शास्त्रातील ग्रंथ आपल्या भेटीला या सुत्रानुसार शहरात ‘पुस्तक आपल्या भेटीला’ या उपक्रमाच्या माध्यमातून 10 पुस्तक दालने विविध ठिकाणी लावून वाचकांना मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. वाचनालयाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.सुशील अत्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना वाचनाची आवड कमी होत असतांना आज वाचनालयाने वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी पुस्तक भेटीला हा उपक्रम वाचन संस्कृती वाढवण्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठेरल असे सांगितले. वाचकदूत जमादार याने हा उपक्रम जळगाव शहरात भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, बहिणीबाई उद्यान, गणेश कॉलनी, रामानंदनगर, सेंट्रल मॉल, इंद्रप्रस्थ नगर, सिव्हील हॉस्पिटल, आचार्य कॉम्प्लेक्स या 10 ठिकाणी आयोजित करण्यात आला. कार्यकारी मंडळ सदस्य संगिता अट्रावलकर, डॉ.शिल्पा बेंडाळे, संगणक समितीचे निमंत्रक प्रा.डॉ.मनिष जोशी, वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रभात चौधरी, ग्रंथपाल अनिल अत्रे, संजय शिन्दीकर, अनिल भावसार, रत्नाकर पाटील, मोहिनीराज जोशी, गिरीश तारे, ज्ञानदेव वाणी व वाचक वृंद उपस्थित होते.


इकरा शाहीन उर्दू प्राथमिक शाळा
येथील इकरा शाहीन उर्दू प्राथमिक शाळेत माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक काझी अखतरुद्दीन यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनविषयी व त्यांनी देशासाठी तसेच अभ्यासाबाबत चिकाटी व इतर माहिती दिली.या कार्यक्रमात वाचनाचे फायदे व उपयोगिता आवडत्या पुस्तकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुलांचे प्रकट वाचन व वाचनात येणार्‍या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उत्कृष्ट वाचन केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक अखतरुद्दीन काझी, तन्वीर शाह, उजमा शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


इकरा हायस्कूल
इकरा शिक्षणसंस्थेद्वारा संचलित इकरा उर्दू हायस्कूल सालार नगरमध्ये वाचन प्रेरणा दिवस शाळेचे उपशिक्षक जाकीर हुसेन खान यांच्या मार्गदर्शनात साजरा झाला. यावेळी उपशिक्षक रियाज अहमद जाफर शाह यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या संघर्षाविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कलामांच्या आठवणींबरोबर त्यांच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी त्यांना वाचन साहित्य वाटप करुन उपक्रम राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डॉ.शेख हारुन बशीर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील उपशिक्षक जावेद शेख, अब्दुल कय्युम शेख, सादिक शेख, नूर इकबाल, फरहत खान, नफिस शेख, नसरीन खान, सना शेख, यास्मिन आरा आदींनी परिश्रम घेतले.