जळगाव – केसीई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात प्राचार्य डॉ.ए.आर.राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वयंशासित दिन” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अध्यापक विद्यालयाची छात्राध्यापक व्ही.व्ही .सोनावणे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या करूणा सपकाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांची वर्तमानकाळातील व भविष्यकाळातील भूमिका या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अध्यापक विद्यालयाची छात्राध्यापक व्ही.व्ही.सोनावणे यांनी अध्यक्षीय भाषणातून आजच्या शिक्षकदिनाच्या अनुभवाचे कथन केले. या कार्यक्रमाला डी.एल.एड. विभाग प्रमुख प्रा.दुष्यंत भाटेवाल, प्रा.एच.टी.चौधरी, प्रा.एस.व्ही.झोपे, प्रा.एस.एस.तायडे, प्रा.एस.एम.पाटील, ,प्रा.किसन पावरा, जयश्री तळेले उपस्थित होते. यावेळी मनीष बागुल, सय्यद कायनात, नेहा पाटील, वैशाली राजपूत, सुवर्ण सूर्यवंशी यांनी शिक्षक दिनाविषयीचे महत्व सांगितले तर जयश्री भावसार व पूजा बाकसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद कायनात, प्रास्ताविक देवयानी जगताप तर आभार वैशाली राजपूत यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम व व्दितीय वर्षाच्या डी.एल.एड. छात्राध्यापकांनी परिश्रम घेतले.