अनंत चतुर्दशीदिनी गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप!

0

513 सार्वजनिक व 7064 घरगुती गणपतींचे विसर्जन

नवी मुंबई । गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशा नामघोषात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व 23 विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे विघ्नहर्त्या श्रीगणरायाचा विसर्जनसोहळा अनंतचतुर्दशीदिनी निर्विघ्नपणे संपन्न झाला. महापालिका क्षेत्रात एकुण 513 सार्वजनिक व 7064 घरगुती अशा एकूण 7577 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन उत्साहात संपन्न झाले.

या विसर्जनाप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आकाराने मोठ्या मूर्तींची संख्या लक्षात घेऊन विसर्जनस्थळी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. श्रीगणेश उत्सवाच्या अनंतचतुर्दशीदिनी होणार्‍या विसर्जनामध्ये सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचा समावेश असल्यामुळे सर्वच विसर्जनस्थळांवर मोठ्या तराफ्यांसोबत फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. 23 स्थळांवर विसर्जन बेलापूर विभागत 5 विसर्जन स्थळांवर 1117 घरगुती व 50 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 49 घरगुती व 1113 सार्वजनिक, वाशी विभागात 3 विसर्जन स्थळांवर 901 घरगुती व 80 सार्वजनिक, तुर्भे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 572 व 36 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 1061 घरगुती व 102 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 1111 घरगुती व 100 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 635 घरगुती व 23 सार्वजनिक, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळांवर 554 घरगुती व 73 सार्वजनिक अशाप्रकारे एकुण 23 विसर्जन संपन्न झाले. महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह महापौर सुधाकर सोनवणे यांनीही विसर्जन स्थळांना भेटी देऊन पाहणी केली व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.