अनधिकृत औषधांच्या साठा ठेवल्याप्रकरणी दोघांना अटक

0

मुंबई – अनधिकृतपणे औषधांचा साठा ठेवल्याप्रकरणी दोघांना काल गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. संतोष शिवनाथ हलवाई आणि अस्लम अबूबकर नाई अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 999 कॉरेक्स या कोडीनमिश्रीत बाटल्या आणि निस्त्रावेट नावाच्या गोळ्या साठा जप्त केल्या आहेत.

या औषधांची किंमत सुमारे सव्वालाख रुपये आहे. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुर्ला येथील एस. जी. बर्वे मार्गावरील महानगरपालिकेच्या लक्ष्मण यादव मंडईजवळ काही तरुण मोठ्या प्रमणात औषधांचा साठा घेऊन येणार आहे. हा साठा त्यांनी अनधिकृतपणे साठवून ठेवलाा असून त्याची विक्रीसाठी ते तिथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या संतोष हलवाई आणि अस्लम नाई या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांना सव्वालाख रुपयांचा औषधांचा साठा सापडला. या औषधांचा साठा ठेवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्रे नव्हते. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ते औषधे का खरेदी केले होते, त्याची ते कोणाला विक्री करणार होते याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.