पिंपरी :- देहू-आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सहा टपऱ्यांवर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. तसेच यामध्ये एक तीन चाकी वाहन जप्त केली असून तळवडे येथे गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या सहा अनधिकृत पत्राशेडवरही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत व्यवसायामुळे वाहतूकीस होते कोंडी
देहू-आळंदी हा रस्ता नेहमी गजबजलेला असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. तरीही देखील या रस्त्यावर टपऱ्या टाकून काही जण अनधिकृतपणे व्यवसाय करीत असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आषाढी वारी पालखी सोहळा देखील तोंडावर आला आहे. त्यामुळे फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अशा टपऱ्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. एकूण 5 हजार 969 चौरस फूट जागेत या सहा पत्राशेड उभारण्यात आल्या होत्या. त्या सर्व हटविण्यात आल्या.