अनधिकृत प्रार्थना स्थळांवर हातोडा

0

नवी मुंबई । खारघर परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या प्राथनास्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खारघर येथील सेक्टर-11 मध्ये अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले साईबाबा मंदिर तोडण्यात आले आहे. अंदाजे 600 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले. खारघर येथील सेक्टर-11 मधील भूखंड क्र. 16 वर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले शनि मंदिर निष्कासित करण्यात आले व अंदाजे 200 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण
खारघर येथील सेक्टर-16- 17 मध्ये अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले गणेश मंदिर निष्कासित करण्यात आले व अंदाजे 400 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले. खारघर येथील सेक्टर-11 मध्ये भूखंड क्र. 24 वर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले राम मंदिर निष्कासित करण्यात आले व अंदाजे 500 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले. खारघर येथील सेक्टर-11 मध्ये अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले महाकाली मंदिर निष्कासित करण्यात आले व अंदाजे 300 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले. कोणत्याही मालकी हक्क आणि विकास परवान्याशिवाय सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर उभारण्यात आली होती आणि सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही अतिक्रमणे निष्कासित केली. या कारवाईवेळी अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचे नेतृत्व एस. एस. पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी केले.

ओवे-खारघर येथील सेक्टर-30 मध्ये अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेला मदरसा निष्कासित करण्यात आला. अंदाजे 300 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले. खारघर येथील सेक्टर-19 मध्ये भूखंड क्र. 202 वर पत्रा शेडच्या साहाय्याने उभारण्यात आलेली दोन अनधिकृत मंदिरे निष्कासित करण्यात आली व अंदाजे 1000 चौ. मी. इतके क्षेत्र रिकामे करण्यात आले. खारघर येथील सेक्टर-15 मध्ये डीएव्ही शाळेजवळ अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले गणपती आणि देवी मंदिर निष्कासित करण्यात आले.