जळगाव : शहरातील अतिक्रमण निर्मृलन पथकाच्या कर्मचारी व हॉकर्स धारकांमध्ये अतिक्रमण काढण्यावरून वाद होवून हाणमारी होण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आज शुक्रवारी तर अनधिकृत बँनर वाढदिवसाचा फलक काढतांना फलक लावणार्यांनी अतिक्रमण पथकातील दोन कर्मचार्यांना मारहाण करून जखमी केले. ही घटना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. तर जखमी अतिक्रमण कर्मचार्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.
महापालिका प्रशासनातर्फे शहरातील हॉकर्सचे अतिक्रमण काढण्याच्या मोहिम सुरू आहे. त्यात शहरातील अनधिकृत बँनर काढून बँनर लावणार्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या मोहिमे अंतर्गत आज सकाळी साडेदहा वाजता शनिपेठ परीसरातील भिलपुरा चौकीजवळ विद्युत खांब्यावर बंटी गवळी याचे अनधिकृत वाढदिवसाचे लागवलेले होते. ते बँनर अतिक्रमण कर्मचारी काढतांना वाद झाला. बँनर लावणारे बंटी गवळीसह मनोज गवळी व त्यांचे तीनही मुले यांनी अतिक्रमच्या कर्मचार्यांशी वाद घातला. त्यातील दोन जणांनी अतिक्रमणचे हरी सोमा सोनवणे या कर्मचार्याला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी अतिक्रमणच्या गाडीवरील चालक साजीद अली याने सहकारी सोनवणेला वाचविण्यासाठी मधे पडला असता साजीद अलीला देखील मारहाण केली. तर हरि सोनवणे यांच्या उजव्या हाताच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयीत मनोज गवळी व बंटी गवळी यांच्यावर गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
अन्..ट्रकमधून खेचून मारहाण
अतिक्रमण कर्मचारी हरि सोनवणे, अनिल सोनवणे, शांताराम विठ्ठल यांनी भिलपुरा चौकीतील बंटी गवळी याचे वाढदिवसाचे अनधिकृत फलक काढून जप्त केले. यानंतर बँनर लावणारे दोन जणांनी येवून अतिक्रमणच्या कर्मचार्यांशी वाद घातला. शाब्दीक वाद झाल्यानंतर ट्रॅकमध्ये बसलेले हरी सोनवणे या कर्मचार्याला मनोज गवळी यांच्या मुलांनी ट्रकच्या बाहेर खेचून मारहाण केली. यावेळी चालक साजीद अली सहकारी सोनवणे यांना वाचवित असतांना त्यांना देखील मारहाण केली.
कर्मचारी आले पोलीस ठाण्यात
अतिक्रमच्या कर्मचार्यांना मारहाण झाल्यानंतर पथकातील इतर कर्मचार्यांनी दोन्ही जखमी कर्मचार्यांना घेवून ट्रक थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात आणून घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी खबर दिली. पोलिसांनी दोन्ही जखमींनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवून त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हरि सोनवणे यांच्या हाताच्या दंडावर धार-धार शस्त्राने वार केला असल्याने त्यांना गंभीर इजा झाली आहे.
फलक काढण्याचे दिल्या होत्या सुचना
बंटी गवळी याच्या वाढदिवसाचे फलक अनधिकृतरित्या भिलपुरा चौकातील विद्यूत खांब्यावर लावण्यात आले होते. त्यामुळे ते फलक काढण्याच्या सुचना महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे बंटी गवळी याला देण्यात आली होती. परंतू फलक न काढल्याने आज फलक काढण्यासाठी गेले असता आम्हाला मारहाण झाल्याची माहिती मनपा अतिक्रमण कर्मचारी हरि सोनवणे यांनी दिली.