मुंबई : पालिकेच्या पी/दक्षिण विभागाने 53 अनधिकृत आणि वाढीव बांधकामांवर तसेच 250 फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे येथील अनधिकृत दुकानदार आणि फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी ही कारवाई केली. गोरेगाव (प.) येथील ग्रामपंचायत रोड आणि टोपीवाला मार्केट रोड येथील सुमारे 250 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.