पिंपरी : शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहे. मात्र, महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात अवघ्या 811 जणांना केवळ नोटिसा दिल्या असून कारवाई मात्र शून्य आहे.
कारवाईचे नाटक केले जाते. पुढे त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा, आरोप होत आहे. राज्य सरकारने शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करणाची नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये 2015 पूर्वीचीच अनधिकृत बांधकाने नियमित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2015 नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनाला कारवाई करावी लागणार आहे.