अनधिकृत बांधकामांवर हातोडा

0

पुणे । पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत धानोरी, टिंगरेनगर, आंबेगाव बुद्रुक परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. या कारवाईत सुमारे 12 हजार 460 चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. या सर्व परिसरातील अनधिकृत बांधकामे नष्ट करण्यात आली. धानोरी, टिंगरेनगरमधील सर्व्हे क्रमांक 33, 36, 27 भागात करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 4 हजार 960 चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. याशिवाय आंबेगाव बुद्रुकमधील कारवाईत ऑलिव्ह सोसायटी येथील 2 हजार 500 चौरस फूट व त्रिमूर्ती चौक परिसर येथील पाच हजार चौरस फुटांचे क्षेत्र मुक्त करण्यात आले.