अनधिकृत बांधकामाबाबत पिंपरीतील सोसायटीला नोटीस

0
पंधरा दिवसात कारवाई करणार
पिंपरी-चिंचवड : रहिवासी सोसायटीचे बांधकाम करताना काही बाबी अनधिकृतपणे केल्या असल्याच्या कारणावरून महापालिकेने पिंपरी मधील कोहिनूर वायोना सहकारी गृहरचना संस्था या सोसायटीला नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर बांधकाम येत्या पंधरा दिवसात काढून घ्यावे अन्यथा  महापालिका कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्यावर गेट, बाल्कनी बंदिस्त
पार्किंगच्या जागेत सोसायटीचे कार्यालय बांधण्यात आले आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मंदिराचे बांधकाम, महापालिकेच्या रस्त्यावर सोसायटीचे लोखंडी गेट बसविले आहे. तसेच काही नागरिकांनी महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता सदनिकांच्या बाल्कन्या बंदिस्त केल्या आहेत. विनापरवाना स्टोअर हाऊसचेही बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत लोक जनशक्ती पार्टीचे पुणे जिल्हा शहर अध्यक्ष विनोद भालेराव यांनी महापालिकेला अर्ज दिला होता. त्याबाबत महापालिकेने प्रत्यक्ष पाहणी करून बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावली आहे.