अनधिकृत बांधकामे पाडली

0

चिखली । महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चिखली, कुदळवाडी येथे चालू असलेल्या अनधिकृत पत्राशेडवर आणि बांधकामांवर बुधवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये पाच गाळ्यांचे पत्राशेड, क्षेत्रफळ अंदाजे 464 फूट, दोन बांधकामे क्षेत्रफळ अंदाजे 130 चौरस फुटावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कार्यकारी अभियंता पी. पी. पाटील, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जेसीबी, एक डंपर आणि मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.