बारामती । बारामती महसूल प्रशासनातर्फे 158.02 ब्रास अनधिकृत वाळू जप्त करण्यात आलेली आहे. या वाळूचा जाहीर लिलाव गुरुवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता बारामती येथील तहसील कार्यालयात घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सांगितले.
नियमित आयकर भरत असल्याचा पुरावा, पॅनकार्डची छायांकित प्रत, विक्रीकर विभागाचा टिन नंबर आदी कागदपत्रांची पूर्तता करणार्यांनाच लिलावात सहभागी होता येणार आहे. लिलाव निविदा भरताना संबंधिताने निवासाचा पुरावा तसेच लिलाव सुरू होण्याच्या किमान एक तास आधी जाहीर अनामत रक्कम 50 हजार रुपये रोखीने भरणे आवश्यक आहे. बारामती शहर पोलीस ठाणे वडगाव निंबाळकर व माळेगाव पोलीस ठाणे येथील एकूण 158.02 ब्रास वाळू व त्याची निश्चित केलेली रक्कम 8 लाख 50 हजार 622 रुपये आहे. लिलावाच्या अटी, शर्ती व जागेचा तपशील आदी बाब अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत बारामती तहसील कार्यालय येथे पाहावयास मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.