खासदार रक्षा खडसे यांची भुसावळ डीआरएम यांच्याकडे मागणी
भुसावळ- भुसावळ विभागातील इटारसी, बडनेरा ते मनमाड, जळगाव दरम्यान अनधिकृत विक्रेत्यांद्वारे केळीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याच्या तक्रारी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या संदर्भात डीआरएम यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केळी हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असून त्याच्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. याच चोरीच्या केळ्यांची विक्री या अनधिकृत विक्रेत्यांद्वारे धावत्या ट्रेनमध्ये होत असल्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात आला आहे. या अनधिकृत विक्रेत्यांद्वारे होणार्या विक्रीला आळा घालून त्यांच्यावर कडक कारवाई करावीख अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी भुसावळ विभागाचे डीआरएम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.