हडपसर । अशोकनगर समोरील जागेवर विनापरवाना दुकानासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. फोश फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव माने व निलेश क्लासिक सोसायटीतर्फे याबाबत तक्रार करण्यात आली होती.
आजूबाजूच्या परिसरात अवैध बांधकामाचे प्रमाण वाढले आहे. त्यावरसुद्धा लवकरच कार्यवाही करण्याची विनंती महापालिकेला करण्यात येणार आहे. परिसरातील अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका केवळ बघ्याची भूमीका घेत आहे, असे स्थानिक रहिवासी वैभव माने यांनी सांगितले. कधीतरी कारवाई होते, पून्हा जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील अतिक्रमणे तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.