बोदवड । भुसावळ ते सुरवाडा शेती परिसरात अवैध ब्लास्टींग करताना पोलीसांनी एकास अटक केली ट्रॅक्टरसह जिलेटीन व डिटोनेटर असा 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरा आरोपी मात्र फरार आहे.
चिंतामण पाटील यांच्या शेतात ब्लास्टींग करताना मुकेशसिंग कछवा (रा. शिंदी) यास पोलीसांनी अटक केली. त्याचकडून ट्रॅक्टर (क्र. आर.जे. 06, आर.ए. 6789) 2 हजार 500 रुपये किंमतीचे जिलेटीन, डिटोनेटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.